केंद्र सरकार, भांडवलदारांविरोधात हा श्रमिकांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:13+5:302020-12-22T04:15:13+5:30

नाशिक : नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना ...

This is the struggle of the workers against the central government, the capitalists | केंद्र सरकार, भांडवलदारांविरोधात हा श्रमिकांचा लढा

केंद्र सरकार, भांडवलदारांविरोधात हा श्रमिकांचा लढा

Next

नाशिक : नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद्र सरकारने भाजप, आरएसएस आणि अडाणी, अंबानी यांसारख्या भांडवलदारांच्या दबावातून केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केला आहे.

हे कारस्थान आता शेतकरी, श्रमिकांच्या लक्षात आले असून, आता ही लढाई केंद्र सरकारसह भांडवलदारांविरोधात या देशातील श्रमिक अशी झाली असून, या शेतकऱ्यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास केरळचे खासदार के. के. रागेश यांनी व्यक्त केला.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे प्रस्थान करण्यासाठी नाशिकमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करताना ते सोमवारी (दि.२३) बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीत पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश , उत्तराखंडसारख्या वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांनी दिल्लीत जाणारे पाचही राष्ट्रीय महामार्ग रोखले आहेत. त्यांच्या आंदोलनाला नाशिकधून निघणारे राज्यभरातील शेतकरी बळ देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्लीतील हाडे गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी रस्त्यावर बसले असून, आतापर्यंत या आंदोलनात ३६ शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार, असा सवालही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला केला. त्यांच्यासोबत माजी आमदार नरसय्या आडम, जे. पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले आदी विविध संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. दरम्यान,आंदोलकांच्या प्रतिनिधींनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत आंदोलनात सहभाग घेतला.

इन्फो- १

तीन हजार शेतकरी, कामगारांचा सहभाग

केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कृषी उत्पादन, व्यापार आणि करार शेतीसंदर्भातील कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्याचप्रमाणे केंद्राने कामगारांच्या विरोधातही चार कायदे आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच या आंदोलनात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

इन्फो-२

काँग्रेससह विविध संघटनांचा पाठिंबा

राज्यभरातून नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर एकत्र येऊन दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी मोर्चाला काँग्रेसच्या माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. त्याचप्रमाणे संगिनी महिला संघटनेच्या अनिता पगार, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशिकांत उन्हवणे, आपचे योगेश कापसे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शविला.

इन्फो- ३

किसान जिंदाबादच्या घोषणा

दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात वेगवेगळ्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनीही हल्लाबोलचा नारा देत सहभाग नोंदवला. आंदोलकांनी मोदी शासन होश मे आओ, मोदी शाह होश में आओ, हम अपना अधिकार मांगते, कोण बनाया हिंदुस्थान, इस देश के मजदूर किसान, काला कानून वापस लो, लढेंगे, जीतेंगे, किसान जिंदाबाद, इन्कालाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

(फोटो-२१पीएचडीसी८०)

(फोटो-२१पीएचडीसी ९०) शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना संबोधित करताना राज्यसभा खासदार के. के. रागेश.

Web Title: This is the struggle of the workers against the central government, the capitalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.