रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या नागरिक त्रस्त : वाहतुकीला अडथळा; मालकच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:26 PM2017-11-19T23:26:52+5:302017-11-19T23:31:14+5:30
सातपूर : परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी बैठक मारून ताबा घेतल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांच्या अघोषित रास्ता रोकोमुळे रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे.
सातपूर : परिसरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी बैठक मारून ताबा घेतल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मोकाट जनावरांच्या अघोषित रास्ता रोकोमुळे रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे.
सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिंद्र अॅन्ड महिंंद्र्र सर्कल, ईएसआय रुग्णालयासमोर, सातपूर टाऊन पोलीस चौकीसमोर आदींसह विविध ठिकाणी, चौकाचौकात मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असतो. रस्त्यावर बसलेल्या जनावरांना टाळण्याच्या नादात वाहनांचा वेळप्रसंगी अपघात होत आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी ही जनावरे अंधारात ठाण मांडून बसलेली असतात त्यावेळी वाहनधारकांना याचा अंदाज येत नसल्याने ते थेट जनावरांवर जाऊन आदळतात.
अपघात टाळण्यासाठी या मोकाट जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. जनावरे मोकाट सोडणाºया मालकांना समज द्यावी, अन्यथा ही जनावरे कोंडवाड्यात टाकण्यात यावीत, अशीही मागणी केली जात आहे.