कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 05:18 PM2019-04-30T17:18:56+5:302019-04-30T17:22:16+5:30

पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या मिरवणूका पार पडल्या.

Struggling settlement succeeds; Peace prevailed in the city during elections | कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम

कडेकोट बंदोबस्त यशस्वी; शहरात निवडणूक काळात शांतता कायम

Next
ठळक मुद्देकुठल्याही स्वरूपाची गंभीर घटना घडली नाही. ३३वेळा कोम्बींग; रात्री पोलिसांनी गुन्हेगारांना दिला हिसका

नाशिक : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण १ हजार २१७ बूथवर मतदानप्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळात कोठेही कुठल्याही स्वरूपाची गंभीर घटना घडली नाही. यामुळे मतदानाच्या दिवशी तसेच संपुर्ण निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेत कायदासुव्यवस्था अबाधित राहिली. आयुक्तालय स्तरावर विशेष पोलीस दलाच्या सशस्त्र जवानांसह सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकूणच शहरात सर्वत्र पार पडलेली मतदान प्रक्रिया हे ‘खाकी’चे यश असल्याचे नागरिकांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलीस आयुक्तालय हद्दीत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी संपुर्ण सुरक्षाव्यवस्थेचा वेळोवेळी आढावा घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून विश्वास दाखवत सुक्ष्मपणे बंदोबस्ताचे नियोजन केल्याने शांततापूर्ण वातावरणात निवडणूकसह विविध जयंती उत्सवांच्या मिरवणूका पार पडल्या.
नांगरे-पाटील यांनी आदर्श आचारसंहिता जाहीर होताच ‘ब्लू-प्रिंट’वरील गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ-१ व २मध्ये उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे तसेच गुन्हे शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी आदेशानुसार धडक कारवाईला प्रारंभ केला. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यापासून तडीपार गुंडांचा शोध घेऊन शहरात आढळून आल्यास कारवाई करण्यापर्यंत तसेच टवाळखोरांनाही ‘खाकी’ने दंडुका दाखविला. यामुळे पोलिसांचा धाक शहरात निर्माण झाला होता. महिनाभरात आयुक्तालय हद्दीत ५वेळा आॅल आउट आॅपरेशन राबवून भर रात्री पोलिसांनी गुन्हेगारांना हिसका दिला. तसेच ३३वेळा कोम्बींग आॅपरेशन मोहीमदेखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने राबविली गेली. यामुळे गुन्हेगारांना जरब बसण्यास मदत झाली.

Web Title: Struggling settlement succeeds; Peace prevailed in the city during elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.