पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 06:28 PM2019-07-19T18:28:26+5:302019-07-19T18:29:54+5:30

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.

Struggling Women's Stamps | पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सटाणा पालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी आज शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान शहरातील टंचाई निवारणसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी बैठक घेऊन सूचना केल्यानंतर महिलांनी ठिय्या मागे घेतला.
गेल्या 1 वर्षापासून सटाणा शहरात भीषण पाणी टंचाई आहे . त्यावर त्विरत व दीर्घ मुदतीसाठी कायमस्वरु पी उपाय करावेत अशी मागणी केली होती .मात्र पालिकेने कोणत्याही उपाययोजना न केल्याने संतप्त झालेल्या 25 ते 30 महिलांनी आज शुक्र वारी दुपारी 12 वाजता पालिका कार्यालयावर हल्लाबोल करून प्रवेशद्वारा जवळच ठिय्या दिला.यावेळी आंदोलनकर्त्या एड.सरोज चंद्रात्रे म्हणाल्या की, गेल्या एिप्रल मध्ये जिल्हाधिकारी सटाणा येथे आले असतांना पाणी टंचाईची भीषणता त्यांना दर्शवण्यात आली होती . यावर विहीरी अधिग्रहीत करु न पाणी टंचाई आटोक्यात आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते . मात्र नगरपालिके मार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही . परिणामी पिण्यासाठी व वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने सामान्य नारिक हैराण झाले आहेत . पिण्यासाठी वीस लिटर पाण्यासाठी 60 ते 70 रु पये मोजावे लागत आहेत . त्यामुळे पाणी पट्टी भरूनही गरीब जनता भरडली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. . पुनद प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास कमीत कमी दिड ते दोन वर्षाचा अवधी लागणार आहे . अशा परिस्थितीत नगरपालिका ढिम्मपणे बसुन आहे . पाण्यासाठी नागरिक हैराण झाले असुन नगरपालिके मार्फत काहीच पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचा आरोप करत शहरात पाणी पुरवठा करण्याबाबत ठोक रु परेखा जनतेला दयावी अशी मागणी केली.दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आंदोलनकर्त्याशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ठोस उपाययोजना केल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच आंदोलनकर्त्या महिलांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करावा अशा सूचना दिल्या तसेच विहीर अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करावी जेणेकरून जलकुंभ भरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येईल असे स्पष्ट. आंदोलनाची तात्काळ दखल घेतल्याने दोन तासांनी ठिय्या मागे घेण्यात आले. आंदोलनात सरोज चंद्रात्रे, रु पाली पंडित, वंदना भामरे, किरण परदेशी,वंदना सोनवणे, मंगल सोनवणे,विनता सोनवणे,लता पगार, विजया सोनवणे,राधाबाई पगार,संगीता सोनवणे,सुनंदा पवार,शुभांगी कुलकर्णी,ललिता मुळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Struggling Women's Stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.