एसटीचा चक्का जाम

By admin | Published: February 11, 2017 12:50 AM2017-02-11T00:50:31+5:302017-02-11T00:50:46+5:30

भिवंडी घटनेचा निषेध : २५ बसेसला लागला ब्रेक; एकूण ७२ फेऱ्या रद्द

ST's flywheel jam | एसटीचा चक्का जाम

एसटीचा चक्का जाम

Next

नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाणारी शहर बससेवा दुपारपासून मंदावली. नवीन भरती झालेल्या चालक-वाहकांनी भिवंडीच्या घटनेच्या निषेधार्थ ‘दांडी’ मारली. यामुळे विविध मार्गांवरील दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतच्या एकूण २५ बसेसला ‘ब्रेक’ लागल्याने प्रवाशांचे हाल
झाले.
भिवंडी येथील रिक्षाचालकांच्या मारहाणीत एका बसचालकाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.
या घटनेचा निषेध म्हणून नाशिक शहरातील आगार-२ मधील कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर बंद पाळला. यामुळे बससेवा चांगलीच प्रभावित झाली. सुमारे पन्नास ते साठ चालक वाहकांनी यामध्ये सहभाग घेतला असून २५ चालक कामावर हजर न राहिल्यामुळे दुपारनंतर विविध मार्गांवरील बसफेऱ्या प्रशासनाला रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटीला आर्थिक फटका तर बसला असून प्रवाशांचेही हाल झाले. बसचालकांनीही बंद पुकारत पोलीस व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. एसटी प्रशासनाकडून चालक-वाहकांच्या कुठल्याही समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्यामुळे चालक-वाहक रामभरोसे असून ज्यांच्या कष्टावर ‘एसटी’ धावते त्यांच्या तोंडाला नेहमीच प्रशासनाने पाने पुसली आहेत. यामुळे भिवंडीसारख्या घटनांना निमंत्रण मिळत आहे. भिवंडीच्या घटनेची राज्यात कोठेही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस व परिवहन मंत्रालयाने गंभीर दखल घेण्याची मागणी चालकांनी केली आहे.
पंधरवड्यापासून आगार-२ला व्यवस्थापकांची प्रतीक्षा कायम आहे. शहर बसेसच्या २५० फे ऱ्या दिवसभरात होतात. शहरी भागात वाहतूक करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते; मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी गाऱ्हाणे कोणाच्या दरबारी मांडावे हा मोठा यक्ष प्रश्न असल्याचे चालकांनी सांगितले. आगारात चालकांनी मयत बसचालकाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना दिले आहे. शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांच्या नावाने नाशिक महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनाही निवेदन दिले आहे.

थांबे, स्थानकांवर रिक्षाचालकांचा कब्जाशहरातील विविध बसस्थानके, थांबे, आगारांच्या परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा असून अनेकदा रिक्षाचालकांच्या मुजोरगिरीचा थेट सामना चालक-वाहकांना करावा लागतो; मात्र अधिकारी याबाबत गांभीर्याने कुठलीही कारवाई करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ चालक-वाहकांच्या चुका काढण्यातच प्रशासनाला रस असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वप्रथम रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: ST's flywheel jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.