एसटीची लालपरी आता मालवाहतुकीला बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:37 PM2020-06-10T21:37:04+5:302020-06-11T00:58:28+5:30

नांदगाव : यापुढे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशांच्या ऐवजी सामानाचे खोके, पोती व इतर लगेज दिसले तर आश्चर्य वाटायला नको. प्रवासी वाहतूक करताना तोट्यात चाललेल्या महामंडळाने आता मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला असून, सकृतदर्शनी बसची ही सेवा खासगी वाहतूकदारांच्या भाड्यापुढे स्वस्त असल्याने नाशिक ते नांदगाव रासायनिक खतांच्या पाच बसेस येऊन दाखल झाल्या आहेत.

ST's red carpet is now good for freight | एसटीची लालपरी आता मालवाहतुकीला बरी

एसटीची लालपरी आता मालवाहतुकीला बरी

Next

नांदगाव : यापुढे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशांच्या ऐवजी सामानाचे खोके, पोती व इतर लगेज दिसले तर आश्चर्य वाटायला नको. प्रवासी वाहतूक करताना तोट्यात चाललेल्या महामंडळाने आता मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला असून, सकृतदर्शनी बसची ही सेवा खासगी वाहतूकदारांच्या भाड्यापुढे स्वस्त असल्याने नाशिक ते नांदगाव रासायनिक खतांच्या पाच बसेस येऊन दाखल झाल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे नांदगाव व मनमाड येथे रेल्वे मालधक्क्यावर रासायनिक खतांचे रॅक येत नसल्यामुळे नाशिक येथून खतांची वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे रासायनिक खत विक्रे त्यांना लागणाऱ्या अतिरिक्त वाहतूक भाड्याची बचत झाली असल्याचे तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत रासायनिक खतांची चढ्या दराने विक्र ी होण्याची शक्यता निर्माण होऊन शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार होते. याबाबत नांदगाव येथील रासायनिक खते विके्रत्यांकडून मालवाहतुकीसाठी बस उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्याप्रमाणे बुधवारी नांदगाव येथे परिवहन महामंडळाच्या बसमधून खते आणण्यात आली. योग्य वाहतूक भाड्यामध्ये खतांची वाहतूक होऊन नांदगावमध्ये बहुतेक खत विक्रेत्यांकडे रासायनिक खते उपलब्ध झालेली आहेत. बस बंद असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असून, खतांची वाहतुक करून महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
-------------------------
३५ रुपये प्रतिकिमी भाडे
नाशिक ते नांदगाव प्रत्येक बसचे भाडे सुमारे ४००० रु पये. या रकमेत प्रत्येकाला आठ टन रासायनिक खते मिळाली. खासगी वाहतुकीने आठ टन वजनाच्या वाहतुकीसाठी सुमारे ५००० रु पये खर्च येतो. ३५ रु . किमी प्रमाणे भाडे आकारले जाते.
----------------------
१०० किमीच्या अंतरासाठी ३५ रु . प्रतिकिमीप्रमाणे एकेरी भाडे आकारण्यात येईल. एका बसमध्ये आठ टन माल जाऊ शकतो. १०० पेक्षा कमी अंतर असेल तरी ३५०० रु पयेच भाडे असणार आहे. मागणीप्रमाणे बस उपलब्ध आहेत. यामुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार आहे.
- विश्वास गावित, आगारप्रमुख

Web Title: ST's red carpet is now good for freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक