एस.टी.चा ‘टोल फ्री’ क्रमांक वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:22 AM2019-05-14T01:22:52+5:302019-05-14T01:23:31+5:30
राज्य परिवहन महामंडळात सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप आणि प्रलोभनाची शक्यता गृहीत धरून महामंडळाने तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. मात्र हा क्रमांक दीर्घकाळ प्रतीक्षेवर राहत असल्यामुळे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीबाबत महामंडळाकडून निव्वळ औपचारिकता पार पाडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळात सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेत बाह्य हस्तक्षेप आणि प्रलोभनाची शक्यता गृहीत धरून महामंडळाने तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. मात्र हा क्रमांक दीर्घकाळ प्रतीक्षेवर राहत असल्यामुळे तक्रारकर्त्यांच्या तक्रारीबाबत महामंडळाकडून निव्वळ औपचारिकता पार पाडली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
एस.टी. महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीप्रक्रि येत उमेदवार व त्यांच्या नातेवाइकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरतीप्रक्रि येला सामोरे जावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केले आहे. उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल काही शंका अथवा तक्र ार असल्यास, सबळ पुराव्याच्या आधारे १८००१२१८४१४ या नि:शुल्क दूरध्वनी क्र मांकावर संपर्क साधून आपली तक्र ार नोंद करावी, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. मात्र हा क्रमांकच वेटिंगवर असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.
गेल्या २४ फेब्रुवारी रोजी राज्याच्या २१ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८ हजार २२ चालक तथा वाहक पदासाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रि या सुरू असून, यापैकी पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा व संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुणतालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. असे असतानाही अनेक उमेदवारांना प्रलोभन दाखविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्याने महामंडळाने तक्रार करण्यासाठीची व्यवस्था केलेली असल्याचा दावा केला आहे.
आमिष दाखविले
येत्या १७, १८ व १९ मे रोजी विविध वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी होणाऱ्या लेखी परीक्षेबाबतदेखील उमेदवारांना त्रयस्थ व्यक्तीकडून आमिष दाखविण्यात आले तर त्यांनाही टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु ही यंत्रणा किती कुचकामी आहे याची प्रचिती अनेकांना आलेली आहे.