उद्योगभवनजवळ एसटीची दुचाकीला ठोस; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:45+5:302021-07-26T04:13:45+5:30
नियम पाळून मंदिरे खुली करावी सिन्नर : वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराड महाराज यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी व भाविकांना ...
नियम पाळून मंदिरे खुली करावी
सिन्नर : वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराड महाराज यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी व भाविकांना न्याय द्यावा, नियम पाळत मंदिरे खुली करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. नायब तहसीलदार जाधव, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, सुनील महाराज, संजय कदम, नंदू महाराज धोक्रट, प्रसाद महाराज कानडे, शिवाजी गुंजाळ, दौलत धनगर, संदीप लोंढे उपस्थित होते.
चास येथे कृषिदूताचे शेती प्रात्याक्षिक
सिन्नर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत विशाल खैरनार याने चास येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड येथे कृषिदूत खैरनार हा पदवीचे शिक्षण घेत आहे. खैरनार हा माती परीक्षण, बीज प्रक्रिया फळबाग लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे संगोपन आदी विषयांवर शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहे.
सिन्नरला तरुणीचा विनयभंग
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गालगत सिन्नर येथे एका हॉटेलवर वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून चौघांनी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. पीडित तरुणीच्या तक्रारीहून सिन्नर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानोरीत कृषिदूताचा दौरा
सिन्नर : मानोरी येथे मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी कृषिदूत योगेश बैरागी यांनी ग्रामीण कृषी जागरूकता, औद्योगिक कार्यानुभव अभ्यास दौऱ्याचा आरंभ केला. कृषिदूत बैरागी यांनी शेतकऱ्यांना हवामान आधारित शेती, बीजप्रक्रिया माती परीक्षण, एकात्मिक तण, कीड व रोग व्यवस्थापन, चारा साठवणूक व प्रक्रिया, पीक व पाणी व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.