संतप्त नातेवाइकांचा पोलीस ठाण्यात ठिय्यां
By admin | Published: September 26, 2015 11:30 PM2015-09-26T23:30:46+5:302015-09-26T23:31:13+5:30
ज्येष्ठ नागरिकावर हल्ला : २५ दिवस उलटूनही हल्लेखोरांचा तपास नाही
जायखेडा : पहाटे फिरायला गेलेले येथील जेष्ट नागरीक दगा ठाकरे यांच्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावण्यात २२ ते २५ दिवस उलटुनही जायखेडा पोलीसांना अपयश येत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक व कुटुंबियांनी जायखेडा पोलीस ठाण्यात एक ते दिड तास ठिय्या देवून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होळकर यांना घेराव घातला. यावेळी पोलीसांच्या ढिसाळ कारभारा विषयी संताप व्यक्त करीत गुन्हेगारांचा त्वरीत शोध लावावा अशी मागणी करण्यात आली.
जायखेडा- ता. बागलाण येथील दगा तुळशीराम ठाकरे नेहमी प्रमाणे जायखेडा सोमपुर रस्त्यावर पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान फिरायला गेले होते, काही वेळात ते गंभीर जखमी अवस्थेत रस्तेकडेला बेशुद्ध पडलेले आढळुन आले, त्यांच्या पाटीवर व डोक्यावर धारदार शस्राने वार केल्यासारख्या खुना दिसत होत्या तर उजवा हात कोपराजवळ मुडलेला होता, यावेळी प्रथम दर्शनी हा अपघात असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या कुंटूबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करून, त्यांची कन्या जयश्री कळंबकर यांनी जायखेडा पोलीसात फिर्याद दिली असुन अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दगा ठाकरे यांच्यावर. प्रथम नासिक येथील व नंतर मुंबई येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. माञ दुर्दैवाने काल त्यांचे उपच्यारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर लगेचच सर्वांनी पोलीस ठाण्यात आपला मोर्चा वळून पोलीसांना तपासात होत असलेल्या दिरंगाइ बद्दल जाब विचारला. या आधी ही गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधावे अशी मागणी नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केली होती.मात्र तपासात कुठलीच प्रगती न आढळल्याने उपस्थितांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. आमचा तपास चालु आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा असे नेहमीचे उत्तर यावेळी पोलीसांनी उपस्थितांना दिले.