अंबोली घाटात रस्त्याला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:41 AM2018-07-20T00:41:23+5:302018-07-20T00:41:58+5:30
त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी वरसविहीर-नांदगाव - कोहळी मार्गावरील, मूळवडच्या घोटबारी रस्त्यावरील व वाघेरा रस्त्यावरील दरडी कोसळल्या. या दरडी आजच्या आज साफ करून वाहतुकीस सर्व रस्ते मोकळे करून देण्यात आले. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सा.बां. विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदी ताफा होता. या चारही ठिकाणी भेटी देऊन पडलेल्या दरडी साफ करून होईपर्यंत हे अधिकारी तेथेच थांबले होते. यावेळी रस्त्याला तडा गेला होता, तर माती, दगड, मुरूम पडल्याने रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाऊस सातत्याने असल्याने खेड्यापाड्यातील नद्या, नाले आदींना पूर आला होता.
वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. तसेच अंबोली रस्त्यातील खचलेला रस्ता साफ करून एकेरी वाहतूक सुरू केली. तालुक्यातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला जोडणाऱ्या मूळवडजवळील घोटबारीवरून जाणारा आडगाव, गिरणारे, हरसूल, ओझरखेड रस्ता थेट गुजरातकडे जाणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर दरड कोसळून बंद झाला होता. वाहतूक बंद झाल्याने त्वरित सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ मधील उपविभागीय अभियंता नितीन बोरोले, शाखा अभियंता उमाकांत देसले, विजय भदाणे यांनी युद्धपातळीवर माती उपसण्याचे काम करून घेतले.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे.