विद्यार्थी गुणगौरव समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:04 AM2019-10-08T01:04:37+5:302019-10-08T01:04:54+5:30
प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले.
सातपूर : प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले. नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
शर्मा मंगल कार्यालयात आयोजित नाशिक जिल्हा कुंभार विकास समितीच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव, तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, प्रा. रमेश उपाध्ये, विश्वनाथ आहेर, अशोक सोनवणे, रामदास बोरसे, सुरेश बहाळकर, बबनराव जगदाळे, रमाकांत क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, शहर अध्यक्ष बाळासाहेब जोर्वेकर, तुळशीराम मोरे, गुलाबराव सोनवणे, पुंडलिक सोनवणे, नंदमामा सोनवणे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा सत्कार, विशेष कार्य करणाºया समाज बांधवांचा सत्कार आणि अर्जुन बोरसे, गंगाधर जोर्वेकर, केदूपंत भालेराव, शांताराम जाधव, सुरेखा उन्हाळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.