तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:11 PM2019-12-15T23:11:44+5:302019-12-16T00:30:12+5:30
सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली.
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील ॅनिºहाळे-फत्तेपूर येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह विद्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी शपथ घेतली.
येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक विद्यालयात सलाम मुंबई फाउण्डेशन व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने तंबाखूमुक्त अभियान राबविणयात आले. त्यानिमित्त विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मुख्याध्यापक साहेबराव कुटे, सी. एफ. काद्री तसेच अभियानप्रमुख राजाराम आव्हाड यांनी सलाम मुंबई फाउण्डेशनच्या मोबाइल अॅपवरील दिलेले अकरा निकष विद्यार्थ्यांना सांगितले. डी. एल. गर्जे यांनी व्यसनमुक्तीसाठी करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. कलाशिक्षक के. बी. सरवार यांनी विद्यालयाच्या दर्शनीभागात व गावातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व्यसनाधिनता निषेध बंदीचे फलक लावले.
विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक, शिक्षक यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन सर्वांचे प्रबोधन करण्याचे अभिवचन दिले. यावेळी सरपंच आण्णा काकड, सुकदेव काकड, ज्ञानदेव सांगळे, बी. डी. दराडे, शिवाजी शिंदे, बाळासाहेब
सांगळे, आर. जे. पाटील, विलास शेळके, सुनीता गिते. आर. आर. शेळके रवींद्र सांगळे आदी उपस्थित होते.