विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:38 PM2020-01-30T22:38:26+5:302020-01-31T00:55:34+5:30

केबीएच विद्यालय व एसपीएच महिला महाविद्यालय, तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली.

Student Awareness Roundup | विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती फेरी

मालेगाव केबीएच विद्यालय व महिला महाविद्यालयाने काढलेल्या मतदार जनजागृती फेरीत सहभागी झालेले तहसीलदार चंद्रजीत राजपूत, प्राचार्य अनिल पवार, उपप्राचार्य डी. ए. पवार, पर्यवेक्षक विलास पगार, राजेश धनवट आदी.

Next
ठळक मुद्देमालेगाव : केबीएच व महिला महाविद्यालयाचा उपक्रम

मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व एसपीएच महिला महाविद्यालय, तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार चंद्रसिंग राजपूत, नायब तहसीलदार रमेश वळवी, प्राचार्य डॉ. उज्वला देवरे, प्रवीण खैरनार, गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी, डी. ए. पवार, डी. जी. जाधव, सुनील बागुल, पर्यवेक्षक विलास पगार उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी पथनाटय सादर केले. राजेश धनवट यांनी मतदार प्रतिज्ञा दिली. प्रा. जितेंद्र पगार यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार राजपूत यांनी मार्गदर्शन केले. विविध स्पर्धांमधील गुणवंतांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. निबंध स्पर्धेत रोशन खैरनार, भावेश निकम, रोशन साळुंके, चित्रकला स्पर्धेत नचिकेत भदाणे, आओम बोरसे, विश्वजीत शेजवळ, वक्तृत्व स्पर्धेत सुबोध चव्हाण, भावेश निकम, अक्षय बच्छाव यांनी अनुक्र मे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रास्ताविक राजेंद्र शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपांजली बोरसे यांनी केले.

Web Title: Student Awareness Roundup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.