विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी चौघा मित्रांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:45 AM2017-12-23T00:45:58+5:302017-12-23T00:47:00+5:30
आडगाव शिवारातील क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
नाशिक : आडगाव शिवारातील क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयातील शुभम पाटील (२०, रा़ महाबळ रोड, पारिजात कॉलनी, जळगाव) या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खोलीतील चार सहकारी मित्रांविरोधात आडगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २२) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. शुभमने सोमवारी (दि़ १८) आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रूममधील चौघा सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ मूळचा जळगावचा असलेला शुभम पाटील हा
कक़ा़ वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. आडगाव शिवारातील धात्रक फाटा परिसरातील बळीरामनगरच्या एका रो-हाउसमध्ये शुभम हा संशयित अक्षय तुकाराम आवारे, शीतल लक्ष्मण कलाल, नेताजी गोरखनाथ आरोटे व कल्पेश रामचंद्र चौधरी यांच्यासमवेत राहत होता़ या रूममधील पंख्याला गळफास घेऊन शुभमने आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले़ पोलिसांना शुभमचे मृतदेह हा दोन्ही हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता़ त्यामुळे त्याची आत्महत्या की खून याबाबत पोलिसांना संशय होता़ त्यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. रविवारी (दि. १७) रात्रीच्या सुमारास सर्व विद्यार्थी वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेले असता शुभम हा खालच्या खोलीत झोपला होता. सोमवारी सकाळी शुभमचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती़ पोलिसांना शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीत लिहिलेल्या मित्रांच्या नावानुसार पोलिसांचा तपास सुरू होता़
वडिलांची फिर्याद
शुभम पाटील हा क़ का़ वाघ कृषी महाविद्यालयात मायक्रो बायोलॉजीच्या तिसºया वर्षाचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी मयत शुभमचे वडील रामभाऊ पाटील यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी त्याचे रूममधील सहकारी संशयित अक्षय आवारे, शीतल कलाल, नेताजी आरोटे व कल्पेश चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़