संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी प्रश़ासनाचा गोंधळ

By admin | Published: July 14, 2017 03:56 PM2017-07-14T15:56:40+5:302017-07-14T15:56:40+5:30

बारा वाजेपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कसरत

Student disruption due to closure of the website | संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी प्रश़ासनाचा गोंधळ

संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी प्रश़ासनाचा गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी वाढवून दिलेली मूदत संपल्यानंतर संकेतस्थळ बंद झाल्याने बारा वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दाखल झालेले विध्यार्थी व महाविद्यालये प्रशासनाचा गोंधळ उडाला.
शिक्षण विभागाने आकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.१४) दुपारी १२ वाजेपर्यंत मूदत दिली होती. परंतु, ही मुदत विद्यार्थ्यांसाठी असून कनिष्ठ महाविद्यालयांना माहीती अपडेट करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असा समज प्रवेशप्रक्रिया नियंत्रण समिती आणि महाविद्यालय प्रशासनाचा झाल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये सोडण्यात आले. परंतु १२.५ वाजता प्रवेश प्रक्रियेचे संकेत स्थळ अचानक बंद झाल्याने प्रवेश प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसह कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाचाही गोंधळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेचे संकेतस्थळ बंद झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुणे येथील मुख्य कार्यालयासोबतसंपर्क साधून प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळाची माहीती देऊन पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Student disruption due to closure of the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.