तळेगाव दिंडोरी येथे विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:22 AM2018-06-08T00:22:39+5:302018-06-08T00:22:39+5:30
दिंडोरी : तळेगाव दिंडोरी येथील बंधाऱ्यात मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
दिंडोरी : तळेगाव दिंडोरी येथील बंधाऱ्यात मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. पंकज राजेंद्र दिवे असे त्याचे नाव आहे. तळेगाव दिंडोरी येथील राजेंद्र सुखदेव दिवे यांचा मुलगा पंकज राजेंद्र दिवे (१५) हा नववीचा विद्यार्थी मित्रांसोबत बंधाºयात दुपारी १ वाजता अंघोळीसाठी गेला होता. तेथे त्याचा पाय घसरून पाण्यात बुडाला.
यानंतर गावातील पोहणारे युवक व ग्रामस्थ यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. त्यानंतर नाशिक येथील अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले.शोध घेत असताना पिंपळगाव केतकी येथील पोहणाºया रामदास नामक व्यक्तीने पंकज चा शोध घेण्यास महत्वाची भूमिका बजावली.
सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने पंकज चा मृतदेह बाहेर काढला.
अग्निशमन दलाचे जवान आर.आर.खारे ,एन.पी.म्हस्के, अर्जून पोरजे ,डी.पी.दराडे ,जी.आर.पोटींदे ,एस.एस .पिंगळे आदींनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी व्ही पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डी एम आव्हाड, एन आर वाघ , आदी करीत आहेत. यावेळी पोलीस पाटील रोशन परदेशी, ग्रामसेवक एस के नेटके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.