अभियांत्रिकीला प्रवेश देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:21 AM2019-11-25T00:21:13+5:302019-11-25T00:22:09+5:30
जर्मनीत अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आडगाव शिवारातील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला हरियाणातील दोघा भामट्यांनी अंदाजे साडेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूकबाबत आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : जर्मनीत अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आडगाव शिवारातील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला हरियाणातील दोघा भामट्यांनी अंदाजे साडेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूकबाबत आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आडगाव शिवारातील अपेक्षा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या रोहित प्रकाश इंगळे यांनी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्र ारीनुसार हरियाणातील गुडगाव येथील अशिम मल्होत्रा व त्याचा साथीदार रणदीप घोषाल या दोघांनी जून २०१८ ते नोव्हेंबर २०१९ कालावधीत जर्मनीत बी मेकॅनिकल अभियांत्रिकीत प्रवेश मिळवून देतो असे सांगून धनादेश तसेच बँकेतून आॅनलाइन पद्धतीने अंदाजे साडेतीन लाख रु पयांची रक्कम स्वीकारली. फसवणूक झाल्याचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली त्यानुसार दोघा संशयितांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार थेटे तपास करीत आहेत.
पैसे दिल्यानंतरदेखील जर्मनीत प्रवेश मिळत नसल्याने इंगळे याने दोघांची संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने सुरू झाल्याचे लक्षात येताच इंगळे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.