शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने सुरू केले विद्यार्थी वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 03:59 PM2020-08-22T15:59:49+5:302020-08-22T16:00:55+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या गांडोळे येथे गावातील शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने शिक्षकांनी विद्यार्थी वाचनालय सुरू केले आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या गांडोळे येथे गावातील शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने शिक्षकांनी विद्यार्थी वाचनालय सुरू केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शासनाने यावर उपाय म्हणून आॅनलाईन शिक्षण सुरू केले. व्हाट्स अॅप, गुगल मिट, झुमद्वारे शिक्षणाचे धडे गिरवले जातात. मात्र दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग हा अतिशय दुर्गम व आदिवासी लोकवस्तीचा आहे. येथे मोबाईल टॉवर नसल्याने इंटरनेट सेवा पुरेशी नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे जिल्हा परिषद गांडोळे शाळेच्या शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावातील शिक्षण प्रेमी युवकांशी संवाद साधत विद्यार्थी वाचनालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज भोये यांच्या सहकार्याने मोहन जाधव या युवक, पालकाने आपल्या घराची एक खोली विद्यार्थी वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली. येथे शाळेतील अभ्यासक्र मासह छान छान गोष्टी, महापुरु षांची छोटी चित्रे, शैक्षणिक मासिके व पालकांनी भेट दिलेली शालोपयोगी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. तसेच आकाशवाणी संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. शिक्षकांनी वर्गनिहाय वेळापत्रक तयार केले असून एका वेळेस केवळ १२ ते १५ विद्यार्थ्यांना एक तासासाठी प्रवेश देण्यात येतो. मार्गदर्शनासाठी शिक्षक वाचनालयात उपस्थित राहतात.
कोट...
दिंडोरी पंचायत समितीच्या मार्गर्शनाने जिल्हा परिषद गांडोळे शाळेने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद शिक्षण सुरू अंतर्गत नियमांचे पालन करून विद्यार्थी वाचनालय सुरू केले आहे . विदयार्थीभिमुख शिक्षणाला चालना दिली आहे.
-भास्कर कनोज,अध्यक्ष,गट शिक्षणाधिकारी.
कोरोना मुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ती अडचण आमच्या गावात शिक्षकांनी विदयार्थी वाचनालय सुरू करून दुर केली.आमच्या आदिवासी भागात लाईट व मोबाईलची सेवा नियमीत नसल्याने वाचनालय आमच्यासाठी वरदान ठरले आहे.
-धनराज भोये, शालेय व्यवस्थान समिती.