टिकेआर एच विद्यालयात विद्यार्थी-पालक गृहभेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:05+5:302021-07-14T04:17:05+5:30

शासनाचा ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, वह्या तपासणे व ऑनलाईन विद्यार्थी संख्या वाढविणे या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ...

Student-Parent Home Visit at TKR H School | टिकेआर एच विद्यालयात विद्यार्थी-पालक गृहभेट

टिकेआर एच विद्यालयात विद्यार्थी-पालक गृहभेट

Next

शासनाचा ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, वह्या तपासणे व ऑनलाईन विद्यार्थी संख्या वाढविणे या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन टी. के. आर. एच. विद्यालयातील उपमुख्याध्यापक के. डी. दाभाडे, पर्यवेक्षक एन. एम. मांडवडे व शिक्षकांनी गटा-गटाने निमगावी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. शिक्षकांनी ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांना समजून सांगितला. तसेच ऑनलाईन पद्धतीने दिलेला अभ्यास तपासला. ऑनलाईन व ऑफलाईन अडीअडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करून मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष विद्यार्थी व पालक यांना भेटल्यानंतर पालकांनी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, मुलांचे शैक्षणिक खूप नुकसान होत आहे, अशी खंत व्यक्त करून दाखविली. या उपक्रमात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Student-Parent Home Visit at TKR H School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.