संतसेना महाराज पुण्यतिथी निमीत्ताने विद्यार्थी गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 08:56 PM2020-08-16T20:56:25+5:302020-08-17T00:18:03+5:30

लासलगाव : श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त लासलगाव शहर नाभिक समाजाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी (दि.१६) आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्र म साजरा करण्यात आला.

Student praise on the occasion of Sant Sena Maharaj Punyatithi | संतसेना महाराज पुण्यतिथी निमीत्ताने विद्यार्थी गुणगौरव

लासलगाव येथील गुणवंत विद्यार्थी सत्कार करतांना देवगावचे मंडल अधिकारी चंद्रभान पंडीत, मनोहर वाघ, सुखदेव वाघ, पुंजाराम वाघ, गुलाब सुर्वे , अनिल वाघ व अरविंद देसाई आदी.

Next
ठळक मुद्देइयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लासलगाव : श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त लासलगाव शहर नाभिक समाजाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी (दि.१६) आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्र म साजरा करण्यात आला.
श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून शहरातील श्री संत सेना चॉरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यानगर येथील श्री विठ्ठल रु क्मिणी मंदिरात समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर देवगाव येथील मंडल अधिकारी चंद्रभान पंडीत, मनोहर वाघ, सुखदेव वाघ, पुंजाराम वाघ, गुलाबराव सुर्वे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सूत्रसंचालन अनिल वाघ यांनी केले. श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने हिरापूर चांदवड येथील भजनी मंडळाचा कार्यक्र म झाला. या कार्यक्र मास ट्रस्ट अध्यक्ष अरविंद देसाई ,लासलगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप वाघ, उपाध्यक्ष अभिजित जगताप, महिला अध्यक्षा उषा मोटेगावकर यांच्यासह परिसरातील नाभिक समाज बांधव व महिला या कार्यक्र मास उपस्थित होते.

Web Title: Student praise on the occasion of Sant Sena Maharaj Punyatithi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.