विद्यार्थी साठीचे तर शिक्षक ऐंशीचे

By Admin | Published: November 8, 2016 04:00 PM2016-11-08T16:00:00+5:302016-11-08T16:00:00+5:30

नाशिक शहरातील सिध्दार्थ लॉन्सवर एक अनोखा वर्ग भरला होता. या वर्गात विद्यार्थी होते ६५ ते ७० वयोगटातील तर शिक्षक होते ८५ ते ९० वर्षांचे.

For the student, the teacher is the eighth | विद्यार्थी साठीचे तर शिक्षक ऐंशीचे

विद्यार्थी साठीचे तर शिक्षक ऐंशीचे

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
येवला, दि.08 -  नाशिक शहरातील सिध्दार्थ लॉन्सवर एक अनोखा वर्ग भरला होता. या वर्गात विद्यार्थी होते ६५ ते ७० वयोगटातील तर शिक्षक होते ८५ ते ९० वर्षांचे. हे विद्यार्थी आपल्या अर्धांगिनीसह या वर्गात सामिल झाले होते. सन १९६८-६९ या वर्षातील इयत्ता अकरावीच्या वर्गातील विदयार्थी व त्यांना ज्ञानदान करणा-या शिक्षकांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने हा वर्ग भरला. 
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यालयात परिपाठ घेतला जातो त्याप्रमाणे सावधान - विश्राम असे तीन वेळा करुन नंतर सरस्वतीची प्रार्थना घेण्यात आली. १९६८ नंतर जे विद्यार्थी व शिक्षक आज हयात नाहीत अशा सर्वांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आता या उतार वयात कुणीही सत्कार करीत नाही. मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता दाखवत ४८-५० वर्षापूर्वीच्या शिक्षकांना शोधून त्यांचा सत्कार केला. ही बाब नक्कीच वाखानण्यासारखी आहे, असे येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी सांगितले. त्यानंतर उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. यावेळी उपस्थितांना मिष्टांन्न भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
 

Web Title: For the student, the teacher is the eighth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.