विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:42+5:302021-01-08T04:41:42+5:30

दुभाजकावरील सुशोभीकरणाची दुरवस्था नाशिक : महानगरातील विविध रस्त्यांवरील दुभाजकावर सुशोभीकरणासाठी आकर्षक फुलांची लागवड करण्यात आली होती. परंतु, कोरोनाकाळात देखभालीअभावी ...

Student transporters in financial crisis | विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात

विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात

Next

दुभाजकावरील सुशोभीकरणाची दुरवस्था

नाशिक : महानगरातील विविध रस्त्यांवरील दुभाजकावर सुशोभीकरणासाठी आकर्षक फुलांची लागवड करण्यात आली होती. परंतु, कोरोनाकाळात देखभालीअभावी या सुशोभीकरणाची दुरवस्था झाली असून, दुभाजकांवर ठिकठिकाणी रानगवत उगवले असल्याने दुभाजकांच्या बकालपणात भर पडली आहे.

मोबाइलच्या अतिवापराने नेत्रविकाराची भीती

नाशिक : कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले असून, विद्यार्थी मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या मदतीने शिक्षण घेत आहेत; परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

मोकाट श्वानांकडे दुर्लक्षामुळे नाराजी

नाशिक : शहरातील शालिमार, द्वारका, सारडा सर्कल परिसरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी हे श्वान रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. काहीवेळा वाहनांच्या पाठीमागे धावतात यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते. काहीवेळा यामुळे दुचाकी घसरून चालक जखमी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे

नाशिक : परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. भर रस्त्यात असलेले खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात घडण्याची शक्यता आहे. पाथर्डी फाट्यापासून थेट कन्नमवार पुलापर्यंत सर्व्हिस रोडवर खड्डे आढळून येतात. या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत असताना याकडे दुर्लक्ष केेले जात आहे.

वाहनांच्या अडथळ्याने ट्रॅफिक जाम

नाशिक : गडकरी चौक ते सारडा सर्कलदरम्यान असलेल्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबून राहते. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. या भागातील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: Student transporters in financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.