मिठसागरे येथे विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 06:42 PM2019-04-01T18:42:51+5:302019-04-01T18:43:12+5:30
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या पी. बी. कथले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून मतदान जनजागृती फेरी काढून प्रबोधन केले.
सिन्नर: तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या पी. बी. कथले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून मतदान जनजागृती फेरी काढून प्रबोधन केले.
मिठसागरे येथील पी. बी. कथले माध्यमिक विद्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी याासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही रक्षणासाठी व योग्य शासन निर्मितीसाठी आपण स्वत: व परिवारातील आणि परीसरातील सर्व मतदात्यांनी सदृढ लोकशाहीसाठी आपला मतदानाचा अधिकार शंभर टक्के बजावला पाहिजे असे मत मुख्याध्यापक सी. बी. रुपवते यांनी व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीचे विविध फलक हातात घेऊन व घोषणा देत गावातून जनजागृती फेरी काढली. महीला व पुरूष मतदारानी ई व्ही एम मशीन तसेच चिन्ह साक्षांकित करणारे म्हणजे मतदान योग्यच झाले हे दाखविणे याची सखोल माहीती मतदारांना दिली. ग्रामस्थांनाही सहभाग नोंदवून या उपक्रमास प्रतिसाद दिला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.