विद्यार्थ्यांना आॅल द बेस्ट; बारावी परीक्षा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:41 PM2020-02-17T23:41:10+5:302020-02-18T00:15:08+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी या भरारी पथकांची परीक्षेवर करडी नजर राहणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी या भरारी पथकांची परीक्षेवर करडी नजर राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिल्या जाणाºया बारावीच्या परीक्षेची विभागीय शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली असून, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. त्यासाठी नाशिक जिलह्यातून ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून १ लाख ६६ हजार ७१८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेतील यशावर पुढील भवितव्य अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची जोरदार तयारी केली आहे. नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६६ हजार ४६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यात कला शाखेच्या ६६ हजार ७१८, वाणिज्य शाखेच्या २३ हजार ८७४ आणि विज्ञान शाखेच्या ६९ हजार ३३७ तर एमसीव्हीएसीच्या ६ हजार ५४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिक विभागातून नाशिक जिल्ह्णातील ७५ हजार ३४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा यापूर्वीच पार पडल्या असून, १८ फेबु्रवारीपासून सुरू होणारी लेखी परीक्षा १८ मार्चला संपणार आहे. कॉपी व तणावमुक्त परीक्षेसाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाची परीक्षा तणावमुक्त होणार असल्याचा दावा शिक्षण मंडळाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, मागील वर्षी नाशिक विभागात जळगाव जिल्ह्णात कॉपीची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे यंदा या जिल्ह्णात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी संबंधित केंद्र संचालकाची विशेष कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन तसेच सूचनापुस्तिकेचे वाटप करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यंदा भरारी पथकांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे.