विद्यार्थी बस सवलतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:29 AM2018-11-25T01:29:47+5:302018-11-25T01:31:40+5:30

राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करून सोयीसवलती दिल्या असल्या तरी, नाशिक दुष्काळी तालुक्यांत समावेश असलेल्या नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र मोफत बस पास देण्यास एस. टी. महामंडळाने नकार दिला आहे.

 Students are deprived of bus concessions | विद्यार्थी बस सवलतीपासून वंचित

विद्यार्थी बस सवलतीपासून वंचित

Next

नाशिक : राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू करून सोयीसवलती दिल्या असल्या तरी, नाशिकदुष्काळी तालुक्यांत समावेश असलेल्या नाशिक महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र मोफत बस पास देण्यास एस. टी. महामंडळाने नकार दिला आहे. दुष्काळी योजनांची अंमलबजावणीची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाºयांवर निश्चित केलेली असून, त्यांचा आदेश मानण्यासदेखील महामंडळ तयार नसल्यामुळे त्याचा फटका शहरातील हजारो शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे.  अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याबरोबर शेतकºयांकडील वसुलीला स्थगिती, वीजदरात सवलत, रोहयो कामांना प्राधान्य, शेतसारा वसुली माफ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना बस पास सवलत अशा विविध उपाययोजना करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाºयांवर निश्चित करण्यात आलेली असून, त्यांनी संबंधित खात्यांशी संपर्क व संवाद साधून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो की नाही यावर लक्ष द्यायचे आहे.
उपरोक्त योजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, एस.टी. महामंडळाने विद्यार्थ्यांना बस पास सवलत योजनेबाबत काढलेल्या आदेशात शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाºया उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली बस पास सवलतीची रक्कम नोव्हेंबर ते एप्रिल २०१९ पर्यंत येऊ नये, असे नमूद करतानाच सदरची सवलत शहरी बस सेवेसाठी लागू असणार नसल्याचे म्हटले आहे.
दुष्काळी तालुक्यांचा समावेश
एस.टी. महामंडळाच्या या निर्णयाने नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना बस पास सवलतीचा लाभ होणार असला तरी, नाशिक महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना मात्र त्यापासून वंचित रहावे लागणार आहे. दुष्काळी तालुक्यात नाशिक तालुक्याचाही समावेश असून, त्यात नाशिकसह तालुक्यातील ९० गावांचा समावेश असतानाही एस. टी. महामंडळाने महापालिका हद्द वगळली आहे. या संदर्भात विभाग नियंत्रकांकडे जिल्हा प्रशासनाने विचारणा केल्यावर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविले आहे. नाशिक शहरातील हजारो विद्यार्थी दररोज शहर बसने प्रवास करीत असून, त्यांना मात्र आता वंचित रहावे लागत आहे.

Web Title:  Students are deprived of bus concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.