विद्यार्थ्यांना सक्तीने ऐकवले पंतप्रधांनांचे भाषण, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा
By नामदेव भोर | Published: February 16, 2018 06:23 PM2018-02-16T18:23:51+5:302018-02-16T18:37:58+5:30
पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि.16)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्याथ्र्याची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती दिसावी म्हणून शिक्षकांनी सक्तीने बवलेल्या विद्याथ्र्यानी कार्यक्रमात गोंगाट केल्यांने त्यांना शिक्षकांनी कान पिळणो, पाठीवर, तोंडावर चापटीने मारण्यापासून छडीने मारण्यापर्यतची शिक्षा दिली.
नाशिक : नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि.16)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्याथ्र्याची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थिती दिसावी म्हणून शिक्षकांनी सक्तीने बवलेल्या विद्याथ्र्यानी कार्यक्रमात गोंगाट केल्यांने त्यांना शिक्षकांनी कान पिळणो, पाठीवर, तोंडावर चापटीने मारण्यापासून छडीने मारण्यापर्यतची शिक्षा दिली.
पंतप्रधानांचे भाषण व विद्याथ्र्याशी संवाद विद्याथ्र्यानी थेट पुरुषोत्तम विद्यालयात ऐकावा यासाठी शिक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण दाखवविण्यात आले. मात्र, पंतप्रधानांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीतून असल्याने आणि तो अधिक लांबल्याने विद्याथ्र्यानी सभागृहात गोंगाट केला. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी छडीचा वापर क रून विद्याथ्र्याना शिक्षा केली. त्याचप्रमाणो काही शिक्षकांनी विद्याथ्र्याचे कान पिळून तर काहींनी पाठीत व तोंडात चापटी मारून विद्याथ्र्याना शिक्षा केली. विषेश म्हणजे हा प्रकार सुरु असताना शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे ही सभागृहात उपस्थित राहून पंतप्रधानांचा कार्यक्रम पाहत होते. परंतु, त्यांच्या उपस्थितही काही शिक्षकांनी विद्याथ्र्याना अशा प्रकारे शिक्षा केली. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी एमराल्ड स्कूलमधील प्रकरणानंतर विद्याथ्र्याना शिक्षा न करण्यासंबधी काढलेल्या आदेशाला पुरुषोत्तम विद्यालयाच्या शिक्षकांनी केराची टोपली दाखवली असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या गोंधळातही काही विद्याथ्र्यानी मात्र लक्षपूर्वक पंचतप्रधानांचा कार्यक्रम पाहिला आणि या कार्यक्रमातून आम्हाला तणामुक्त राहून परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याविषयी मुख्यध्यापकांना विचारणा केली असता कार्यक्रम लांबल्याने विद्यार्यांना शांत ठेवण्यासाठी शिक्षकांनी त्यांना समज देणे गरजेचे होते. परंतु शिक्षा करणे चुकीचे आहे. अशा प्रकारे शिक्षा करणाऱ्या शिक्षकांना समज दिली जाईल. अशी प्रतिक्रिया पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रताससिंग ठोके यांनी दिली आहे.