विद्यार्थ्यांना भुर्दंड : सरकारचे आदेश धुडकावले महाविद्यालयांत स्टॅम्प पेपरची सक्ती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:07 AM2018-03-02T02:07:36+5:302018-03-02T02:07:36+5:30

नाशिक : मागासवर्गीय, भटके विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास राज्य सरकारने महाविद्यालयांना नकार दिला.

Student's backtrack: The government's mandate to reject the order was stamped for the colleges in the colleges | विद्यार्थ्यांना भुर्दंड : सरकारचे आदेश धुडकावले महाविद्यालयांत स्टॅम्प पेपरची सक्ती कायम

विद्यार्थ्यांना भुर्दंड : सरकारचे आदेश धुडकावले महाविद्यालयांत स्टॅम्प पेपरची सक्ती कायम

googlenewsNext
ठळक मुद्देस्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेतले विद्यार्थ्याला अडीचशे ते तीनशे रुपये खर्च

नाशिक : मागासवर्गीय, भटके विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास राज्य सरकारने महाविद्यालयांना नकार दिलेला असतानाही नाशिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांकडे स्टॅम्प पेपरची सक्ती करू लागल्याची बाब राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसने गुरुवारी समाजकल्याण अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर संबंधित महाविद्यालयाला चांगलेच फटकारण्यात आले असले तरी, अन्य महाविद्यालयांनीही सरकारचे आदेश धुडकावल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. विद्यार्थ्यांना मिळणाºया शिष्यवृत्ती रकमेतून शिक्षण संस्थेचे असलेले शुल्क परत करण्याबाबत सर्व विद्यार्थ्यांकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. वर करणी शंभर रुपयांचा हा प्रश्न दिसत असला तरी, शंभर रुपयांचा स्टॅम्प व त्यावर टायपिंग तसेच प्रतिज्ञापत्र साक्षांकन करून घेण्यासाठी येणारा दीडशे रुपयांचा खर्च पाहता, प्रत्येक विद्यार्थ्याला अडीचशे ते तीनशे रुपये खर्च येत आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वीच विमुक्त जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करून साध्या कागदावर विद्यार्थ्यांनी साक्षांकन करून द्यावे, असे आदेश काढून ते सर्वच विभागांना माहितीस्तव पाठविले तसेच संबंधित सर्व महाविद्यालयांनाही तशा सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र करून द्यावे, याउपरही जर सक्ती केली जात असले तर राष्टÑवादी कॉँग्रेसशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पराग सानप, रोहित पाटील, विकी पवार, सिद्धेश लाडगी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Student's backtrack: The government's mandate to reject the order was stamped for the colleges in the colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.