विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; शिक्षकांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:18 AM2019-10-18T01:18:16+5:302019-10-18T01:20:04+5:30

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे, तर बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होईल.

Students begin to study; Teacher Advice | विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; शिक्षकांचा सल्ला

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; शिक्षकांचा सल्ला

Next
ठळक मुद्देवेळापत्रक जाहीर : १८ फेब्रुवारीपासून बारावी, तर ३ मार्चपासून दहावी परीक्षा

नाशिक : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे, तर बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होईल.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसह शालेय शिक्षक आणि शिकवणी घेणाºया शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागा असाच सल्ला दिला जात आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रका-नुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २२ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी- बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असून एकाचवेळी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना ँ३३स्र://६६६.ेंँंँ २२ूुङ्मं१.ि ्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.






प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Students begin to study; Teacher Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.