शिवकालीन गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन पाहून भारावले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:50 PM2018-02-27T23:50:03+5:302018-02-27T23:50:03+5:30
सिन्नर : शिवकालीन गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन पाहून अभिनव बालविकास मंदिर व लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील चिमुकले भारावून गेले.
सिन्नर : शिवकालीन गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन पाहून अभिनव बालविकास मंदिर व लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील चिमुकले भारावून गेले.
सरदवाडी रस्त्यावरील सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये छत्रपती शिवसन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात शिवरायांचे गड-किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. यात शिवनेरी, राजगड, प्रतापगड, आडगड, सुधागड, अजिंक्यतारा, सोनगड, पट्टागड असे अनेक किल्ल्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी सिल्व्हर लोटसच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक हे नाटक सादर केले. शिवराज्याभिषेक सोहळ्यातील दृश्य पाहून चिमुकले आनंदित झाले. सिल्व्हर लोटस स्कूलचे संस्थापक दिलीप बिन्नर यांच्या पुढाकाराने हे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी अभिनव बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापक संगीता आव्हाड व लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयचे मुख्याध्यापक साहेबराव शिंदे, उपमुख्याध्यापक संजय लोहकरे, गोरक्षनाथ खैरनार, संतोष जगताप, बाळकृष्ण बदादे, वृषाली खताळ, मच्छिंद्र गोहाड, नीतेश दातीर, विकास गिते, विजय सावंत, श्यामराव पगार, गणपत नवले, योगेश घुले, श्रीकांत नवले, अलका धरम, शारदा भगत आदी उपस्थित होते.