शहरातील विद्यार्थ्यांचीही फी माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:22 AM2018-11-20T01:22:41+5:302018-11-20T01:23:09+5:30
नाशिक तालुकाही शासनाने दुष्काळी जाहीर केल्यामुळे साहजिकच नाशिक शहरातही शासनाने घोेषित केलेल्या सवलती लागू होणार असून, विद्यार्थ्यांना मोफत बस पास सवलतीबरोबरच त्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ केले जाणार आहे.
नाशिक : नाशिक तालुकाही शासनाने दुष्काळी जाहीर केल्यामुळे साहजिकच नाशिक शहरातही शासनाने घोेषित केलेल्या सवलती लागू होणार असून, विद्यार्थ्यांना मोफत बस पास सवलतीबरोबरच त्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असल्यास ते शिक्षण संस्थांनी परत करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी दिला आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतचा अहवाल सोमवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यात सरकारने दुष्काळी परिस्थितीसाठी ठरवून दिलेल्या निकषानुसार काय काय कार्यवाही करण्यात आली, तसेच प्रत्येक तालुक्यातील पीक परिस्थितीचाही त्यात उल्लेख करण्यात आला. किती शेतकरी दोन हेक्टरी आहेत व किती त्यापेक्षा कमी याची सविस्तर माहिती त्यात समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील त्याला दुजोरा दिला असून, शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये, घेतले असल्यास ते परत करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याचे पाणी व जनावरांना चारा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना लागू केल्या त्या साºया उपाययोजना नाशिक शहरासही लागू असून, विशेष करून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या फी सवलतीचा लाभ मिळणार आहे.