विद्यार्थ्यांनी केली पुरातन बारव स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 04:59 PM2018-12-22T16:59:28+5:302018-12-22T17:01:40+5:30
सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.
सायखेडा : भेंडाळी येथे अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले दोन पुरातन बारव असून अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक वास्तू मोडकळीला आल्या आहेत. माती, दगड, कचरा यांनी भरलेले बारव स्वच्छ करावे, त्याची डागडुजी करावी अशी अनेक दिवसांची मागणी ग्रामस्थ करत होते. पुरातत्व खात्याने दुर्लक्षीत केलेल्या या बारवांची साफ सफाई सायखेडा येथील महाविध्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.
स्वामी षटकोपचार्य महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा संघाच्या माध्यमातून हिवाळी श्रम संस्कार शिबिरा निमित्ताने गावात साफसफाई करण्यासाठी ७ दिवस मुक्कामी आले आहेत. गावात मुख्य रस्ते आणि गल्ल्या कॉँक्रीेट केलेल्या असल्याने नेमके कोणते काम हाती घ्यावे असा विचार करत असतांना मुख्य समनव्यक प्रा. महेश बनकर गावात फेरफटका मारायला गेले असता गावालगत असलेली पुरातन बारव त्यांनी पाहिली गावकुसाला असलेली बारव हि गावासाठी अभिमानाची बाब आहे. शिवाय गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुढील पिढीला त्याची जाणीव व्हावी, विद्यार्थ्यांना सुद्दा बारव कशी आहे. आणि कोणत्या प्रकारचे बांधकाम आहे. याचा अभ्यास व्हावा म्हणून बारव स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. विद्यार्थ्यांच्या चमूने टिकाव, फावडे यांच्या साह्याने बारव स्वच्छ केली.
अनेक वर्षे पाठपुरावा करून देखील गावाच्या या ऐतिहासिक वास्तूला मोकळा श्वास घेता येत नव्हता. प्रशासकीय अडचणी आणि परवानग्या यात अनेक वर्षे बारव स्वच्छ होत नव्हती. विद्यार्थ्यांनी मात्र काही तासात बारव स्वच्छ केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यासाठी राष्टÑीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. महेश बनकर, प्रा. एस. सी. आहिरे, सचिन शिंदे, दर्शन दराडे, प्रदीप पगारे, भाऊसाहेब आढाव, मयूर जाधव, अजय कारे यांनी प्रयत्न केले.
अहल्यादेवी होळकर यांनी दुरदृष्टीने अनेक गावांत पाण्यासाठी बारव बांधले. ज्या गावात बारव आहे. त्या गावांना नक्कीच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कचरा, माती, दगड यांनी भरलेला बारव विद्यार्थ्यांनी स्वच्छ करून एक प्रकारे ऐतिहासिक वास्तूचा अभ्यास करीत ती टिकविण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
- डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य सायखेडा महाविद्यालय.