विद्यार्थ्यांची तक्रार : एकाच प्रश्नाची पाच वेळा पुनरावृत्ती, अनेक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील अभियोग्यता चाचणी परीक्षेचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:37 AM2017-12-18T01:37:43+5:302017-12-18T01:38:47+5:30

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाºया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा केंद्राचा घोळ दूर करण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला प्रयत्न करूनही यश आलेले नसतानाच प्रत्यक्षात परीक्षा सुरू झाल्यानंतरही परीक्षा प्रक्रियेतील घोळ कायम आहे.

Student's Complaint: Continuous repeat of the same question, persecution of test questions beyond the syllabus | विद्यार्थ्यांची तक्रार : एकाच प्रश्नाची पाच वेळा पुनरावृत्ती, अनेक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील अभियोग्यता चाचणी परीक्षेचा घोळ कायम

विद्यार्थ्यांची तक्रार : एकाच प्रश्नाची पाच वेळा पुनरावृत्ती, अनेक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील अभियोग्यता चाचणी परीक्षेचा घोळ कायम

Next
ठळक मुद्देभोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर विद्यार्थ्यांना अडचणीचा सामनाउत्तर देण्याचा अजब सल्ला

नाशिक : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाºया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा केंद्राचा घोळ दूर करण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला प्रयत्न करूनही यश आलेले नसतानाच प्रत्यक्षात परीक्षा सुरू झाल्यानंतरही परीक्षा प्रक्रियेतील घोळ कायम आहे. एकाच विद्यार्थ्याला एकच प्रश्नाची पाच ते सहा वेळा पुनरावृत्ती होत असल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षा केंद्राचा घोळ झाल्यानंतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक माहिती व तंत्रज्ञान विभागाचा तज्ज्ञ नियुक्त करण्यात आला आहे. परंतु असे असतानाही विद्यार्थ्यांना योग्य मदत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. परीक्षा सुरू असताना अचानक काही प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय दिसणे बंद झाल्याची तक्रार मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाºया गणेश सोनवणे यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार परीक्षा देताना कृष्ण व ब्रह्मदेव यांच्याशी संबंधित विचारण्यात आलेल्या प्रश्नांची पाच वेळा पुनरावृत्ती झाली. तसेच १५ ते २० प्रश्नांच्या उत्तरांचे पर्यायच उपलब्ध न झाल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घटनेवरून परीक्षा परिषदेने राबविलेल्या परीक्षा प्रक्रियेतील उथळ कारभार समोर आला आहे. विशेष म्हणजे गणेश सोनवणे यांनी याप्रकरणी परीक्षा नियंत्रकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांना आहे त्या स्थितीत प्रश्नाचे उत्तर देण्याचा अजब सल्ला देण्यात आला. परंतु तांत्रिक मदत मिळाली नाही. त्यामुळे गणेश सोनवणे यांनी आपल्याला पुन्हा परीक्षेची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान,अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत आतापर्यंत अनेक संदर्भहीन प्रश्न विचारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Student's Complaint: Continuous repeat of the same question, persecution of test questions beyond the syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा