अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:46 AM2018-07-01T00:46:54+5:302018-07-01T00:46:54+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत या वर्षापासून फ्रीज, फ्लोट, स्लाइड पद्धतीऐवजी केवळ फ्रीज आणि नॉट फ्रीज पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत या वर्षापासून फ्रीज, फ्लोट, स्लाइड पद्धतीऐवजी केवळ फ्रीज आणि नॉट फ्रीज पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, प्रवेश प्रक्रियेतील बदलांचा व नियमांचा सखोल अभ्यास करून या सूचनांनुसार प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन डीटीईच्या नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयाने केले आहे. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप राउंड सुरू झाला असून, यात पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळविणाºया विद्यार्थ्यांना नियोजित मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेशप्रक्रि या पूर्ण न करणाºया विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांचा पुढील फेरीसाठी समावेश केला जाणार असून, अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही. तर दुसºया व तिसºया पसंतीचे महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करून चांगला पर्याय मिळविण्यासाठी पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार
आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा सखोल अभ्यास करूनच प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.