विद्यार्थ्यांनी घरीच केली योगासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:36+5:302021-06-22T04:10:36+5:30

निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरीच योगासने केली. निफाड ...

The students did yoga at home | विद्यार्थ्यांनी घरीच केली योगासने

विद्यार्थ्यांनी घरीच केली योगासने

Next

निफाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरीच योगासने केली. निफाड वैनतेय विद्यालयात गुगल मिटद्वारे ऑनलाइन पद्धतीने इयत्ता सातवीच्या २२५ विद्यार्थ्यांनी व ४५ शिक्षकांनी योग प्रात्यक्षिके केली. प्रारंभी नाशिक जिल्हा योग असोसिएशनचे सहसचिव व योगप्रशिक्षक सुभाष खाटेकर यांनी योगाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर योगासनाचे प्रकार व योगाचे शरीराला होणारे फायदे समजावून सांगितले. त्यानंतर साक्षी नागरे, पायल कापसे, कावेरी नागरे, प्रांजल शिंदे, दुर्वा सानप या गाइड विद्यार्थ्यांनी वैनतेय विद्यालयात योग प्रात्यक्षिके केली. या गाइड विद्यार्थिनींच्या योग प्रात्यक्षिकाचे थेट प्रक्षेपण मोबाइलमध्ये बघून विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी योगसाधना केली व वेगळ्या उपक्रमाचा आनंद घेतला.

वैनतेय विद्यालयात न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे सचिव रतन पाटील वडघुले, संस्थेचे विश्वस्त मधुकर राऊत, प्राचार्य एस. पी. गोरवे, उपप्राचार्य बी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, पर्यवेक्षक एन. डी. शिरसाट व सर्व शिक्षक आदींनी विद्यालयात उपस्थित राहून योग प्रात्यक्षिके केली. आभारप्रदर्शन उपप्राचार्य बी. आर. सोनवणे यांनी केले

-----------------------

निफाड येथील वैनतेय विद्यालयात योग दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात प्रात्यक्षिके सादर करताना गाइड विद्यार्थिनी. (२१ निफाड १)

===Photopath===

210621\21nsk_9_21062021_13.jpg

===Caption===

२१ निफाड १

Web Title: The students did yoga at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.