शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा डिजिटल युगात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:20+5:302021-03-22T04:14:20+5:30

नाशिकमधील शासकीय शाळांसोबतच खासगी शाळा व शिक्षण संस्थाचालकांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा निर्धार करीत ऑनलाईन शिक्षण पद्धती आत्मसात केली. ...

Students from the district, including the city, enter the digital age | शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा डिजिटल युगात प्रवेश

शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा डिजिटल युगात प्रवेश

Next

नाशिकमधील शासकीय शाळांसोबतच खासगी शाळा व शिक्षण संस्थाचालकांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा निर्धार करीत ऑनलाईन शिक्षण पद्धती आत्मसात केली. त्याचा नाशिकमधील ७० टक्यांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला. कोरोनाचे संकट गडद असले तरी विद्यार्थ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत डिजिटल युगात प्रवेश केला. नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेसह क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक एज्युकेशन सोसायटी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ अविरत प्रज्वलित ठेण्यात मोलाची भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे, मोबाइल, इंटरनेटअभावी अथवा अन्य समस्यांमुळे ऑनलाइन तासिकेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कमी वेळाचे वेगवेगळे व्हिडियो व्हॉट्स ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. तर काही शिक्षकांनी तर थेट विद्यार्थ्यांच्या दारी पोहचून ही ज्ञानगंगा प्रवाहित ठेवली आहे.

(कोरोना विशेष पानासाठी)

Web Title: Students from the district, including the city, enter the digital age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.