शिक्षकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:34+5:302021-06-02T04:12:34+5:30
दास्तान बॉइज् व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शासकीय रक्तपेढी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ...
दास्तान बॉइज् व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शासकीय रक्तपेढी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाबड यांचे बंधू शेखर भाबड, भगिनी संजीवनी व कन्या विशाखा तसेच भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सचिव विजय बनसेाडे, क्रीडा प्रबोधिनीचे शरद पाटील, गणेश मोरे, आयोजक डॉ. प्रशांत धात्रक, महाराष्ट्र पोलीस दलातील गणेश शिंदे, अमोल चांदवडकर आदी उपस्थित होते.
जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कै. प्रशांत भाबड यांचे सहकारी, विद्यार्थी व खेळाडू अशा ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विशेष काळजी घेण्यात आली.
रक्तदान शिबिरास रक्तपेढी अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर पुरी यांचे मार्गदर्शन लाभले व रक्तपेढी डॉक्टर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
रक्तदाते म्हणून प्रतीक जाधव, यज्ञेश जोशी, दत्तात्रेय धात्रक, शुभम घुले, सौरभ महालकर, यश करंबेळे, भूषण भटाटे, विक्रांत म्हस्के, संतोष शिंदे, वैभव भदाने, योगेश व्यवहारे, योगेश घोलप व इतर उपस्थित होते.
===Photopath===
010621\01nsk_46_01062021_13.jpg
===Caption===
रक्तदान शिबीर प्रसंगी विद्यार्थी