विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 02:49 PM2019-10-19T14:49:33+5:302019-10-19T14:49:43+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव काजी येथे विद्यार्थ्यांनी ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’ साजरा करण्यात आला.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव काजी येथे विद्यार्थ्यांनी ‘दीपोत्सव उत्कर्षाचा’ साजरा करण्यात आला. पणत्यांचा लखलखाट, दारी आकाश दिव्यांचा थाट, दिवाळीसण दिव्यांचा, आणतो जणू चैतन्याची पहाट’ दप्तरमुक्त शनिवार उपक्रमाअंतर्गत माळेगाव काजी येथे हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्याला शक्य होतील अशा एक दोन पणत्या जमा केल्या. त्यांना वातही त्यांनीच लावल्या. शनिवारी सर्वजण रंगीबेरंगी गणवेश परिधान करून दीपोत्सव साजरा करण्यासाठी जमली होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.एकावेळी एवढ्या पणत्या लावून दिवाळी साजरी केलेली नव्हती. या दिवाळीच्या निमित्तानं आज खर्या अर्थाने विद्यार्थ्यांची मनं उजळली. सध्याच्या ताणतणावाखाली आपण स्वत:लाच नीट पाहत नाही. या प्रकाशात स्वत:लाही आपण पाहू शकतो. विवेकाचा उजेड मनामनात पेरण्यासाठी दीपावली ही तर आपल्यासाठी पर्वणीच. त्यासाठी आज आपण प्रतिकात्मक पद्धतीनं हा प्रकाशोत्सव साजरा केला. जिथे प्रकाश असेल तिथे तो जागता ठेवू, जिथे तो नसेल तिथे त्याला जाग आणू. अवघं जीवन प्रकाशमय करून दीपावलीतील या तेजस्वी जाणिवांनी आपली ज्योत उजळणं, हा अंतर्यामीचा खरा दीपोत्सव असेल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक नियाज शेख यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मासाठी विद्यार्थ्यांसोबत रांगोळी काढण्यासाठी सुगंधा साळुंखे , पणत्यांचे नियोजन दातीर तर कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी अशोक चव्हाण , देवरे , विसावे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्र मासाठी दिंडोरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कनोज , विस्तार अधिकारी गवळी , केंद्रप्रमुख पवार यांनी मार्गदर्शन केले.