विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:10 PM2017-08-01T23:10:54+5:302017-08-02T00:11:51+5:30

पेठ : एकीकडे शिक्षणाची ओढ, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांची मालिका या दुहेरी गर्तेत सापडलेल्या पेठ तालुक्यातील मुरु मटी येथील शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून ज्ञानमंदिर गाठावे लागत आहे.

 Student's fatal journey | विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

पेठ : एकीकडे शिक्षणाची ओढ, तर दुसरीकडे नैसर्गिक संकटांची मालिका या दुहेरी गर्तेत सापडलेल्या पेठ तालुक्यातील मुरु मटी येथील शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून ज्ञानमंदिर गाठावे लागत आहे. शिंगदरी ते मुरुमटीदरम्यान मत्स्यगंगा नदी वाहते. या नदीवर आड बु।। येथे धरण बांधण्यात आले आहे. सदरचे धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो होत असल्याने या नदीला पावसाळ्यात मोठा पूर येतो. शिंगदरीवरून मुरुमटी गावाला जाण्यासाठी नदीवर कोणताही पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून जावे लागते.
पूर कमी झाल्यास एक छोटा केटीवेअर कामी येतो; मात्र या केटी बंधाºयावरून नदी पार करताना मोठी कसरत करावी लागते. नदीच्या पलीकडे राहणाºया शाळकरी मुलांना या बंधाºयावरून जीव मुठीत धरून जावे लागते, तर दररोज पालकांना नदी काठावर मुलांना घेण्यासाठी हजर रहावे लागते. ४केवळ दीड फुटाच्या या बांधावरून जाताना थोडा ही तोल गेला तरी अपघात होण्याची शक्यता असून, या नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रलंबित असून, तत्काळ पूल बांधावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून
करण्यात येत आहे.

Web Title:  Student's fatal journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.