नाट्याविष्कारातून विद्यार्थ्यांना मिळतात इतिहासाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:32+5:302021-09-05T04:18:32+5:30
नाशिक : प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा’ या पाठासह तानाजी ...
नाशिक : प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा’ या पाठासह तानाजी मालुसरे यांच्या ‘गड आला; पण सिंह गेला’ यासह प्रतापगडावरील पराक्रम आदी विविध पाठांचे नाट्यरूपांतर करून विद्यार्थ्यांना स्वराज्याच्या इतिहासासचे धडे देण्याचे काम लहवीत परिसरातील वाडीमळा शाळेचे शिक्षक जितेंद्र मानकर करीत आहेत.
शालेय शिक्षणात ज्ञानरचनावादी पद्धतीचा वापर अध्ययन व अध्यापनात झाला पाहिजे, असा आग्रह २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यात धरण्यात आला आहे. त्यालाच अनुसरून मुलांची ज्ञाननिर्मिती ही नैसर्गिक पद्धती औपचारिक शिक्षणात आणतानाच शिक्षण खऱ्या अर्थाने बालकेंद्री होईल, या विचारातून वाडीमळा शाळेचे शिक्षक जितेंद्र मानकर यांनी केलेला अध्यापनाचा प्रयोग शाळेला शंभर टक्के प्रगतीकडे घेऊन जाणारा ठरला आहे.
नाशिक जिल्ह्यातील लहवीत वाडीमळा येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेतील दुसरी ते पाचवीचे विद्यार्थी शंभर टक्के प्रगत झाले असून, पहिलीच्या वर्गातील विद्यार्थीही चांगली प्रगती करीत आहेत. नाट्यमय शिक्षणाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्येही स्वयंअध्ययनाची गोडी निर्माण होत आहे. ही सवय कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. शिक्षणातील नाट्यमयतेमुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे वाचन, संवाद कौशल्यातही गोडी निर्माण होत असून, विद्यार्थी याबाबतीत पारंगत होत आहेत. इंग्रजीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात शब्दसंग्रह करावा यासाठी मानकर प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्यांनी शब्दसंग्रहाचे विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेतले असून, अंताक्षरीच्या माध्यमातूनही ते इंग्रजी शब्दांसोबत विद्यार्थ्यांची ओळख करून देत अशा प्रकारे विद्यार्थ्यांना संवाद कौशल्यात पारंगत करीत आहेत.
शाळेचा झोपडीतून सुसज्ज इमारतीचा प्रवास
शिक्षण विभागाच्या वस्तीशाळा योजनेंतर्गत २ जुलै २००० मध्ये वाडीमळा येथे एका झोपडीत ही शाळा सुरू झाली होती. ही शाळा आता जितेंद्र मानकर यांच्या प्रयत्नांमुळे शासकीय मदत आणि लोकसहभागातून एका सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाली आहे. शाळेचा हा प्रवास सर्वांनाच आकर्षित करणार आहे. शाळेला सेवाभावी संस्था, व्यक्तींकडून संगणक, टीव्ही, खेळाचे साहित्य मिळविण्यासाठीही जितेंद्र मानकर हे विशेष श्रम घेत आहेत.
040921\04nsk_27_04092021_13.jpg
वाडीमळा शाळेतील विद्यार्थ्यांन शिकविताना जितेद्र मानकर