वर्गखोल्यांना गळती लागल्याने विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:42 PM2019-07-11T17:42:35+5:302019-07-11T17:44:09+5:30
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या शालेय वर्गखोल्यांना गळती लागली असून, गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शालेय धडे गिरवण्याची वेळ आली आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Next
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या शालेय वर्गखोल्यांना गळती लागली असून, गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शालेय धडे गिरवण्याची वेळ आली आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सोनारी येथे जुन्या पाच कौलारू, एक सिमेंट पत्र्याची आणि तीन स्लॅबच्या आशा एकूण नऊ खोल्या आहेत. यात कौलारू वर्गखोल्या या २०१३ ला निर्लेखित केल्या आहेत. यातच स्लॅबच्या तिन्ही वर्गखोल्या या
पावसाळ्यात गळत असल्याने गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना धडे गिरवावे लागत आहेत. लाखो रूपये खर्चून एक वर्गखोलींचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्या खोलीच्या स्लॅबची घोटाई न केल्याने तिला मोठ्या प्रमाणात गळती आहे.