विद्यार्थ्यांना तुडवावा लागतो चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:03 AM2019-08-24T01:03:42+5:302019-08-24T01:04:24+5:30
शिंगवे बहुला येथील देवळाली हायस्कूलसमोरील रस्त्यावर पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा व चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून व चिखलातून रस्ता शोधून शाळेत जावे लागत आहे.
देवळाली कॅम्प : शिंगवे बहुला येथील देवळाली हायस्कूलसमोरील रस्त्यावर पाइपलाइनसाठी खोदलेला खड्डा व चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून व चिखलातून रस्ता शोधून शाळेत जावे लागत आहे.
शालेय व्यवस्थापनही चिखलमय खड्ड्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी काही प्रयत्न करताना दिसत नाही. शाळेचा मुख्य रस्ता अगोदरच अरुंद असून, त्यात रस्त्यावर पाइपलाइनसाठी खड्डा करून ठेवल्याने एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक पालकांनी मागणी करूनही लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे अनेकांनी सांगितले.
शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी चिखलातून, गढूळ पाण्यातून ये-जा करावी लागते. विद्यार्थी आजारी पडत असल्याने रस्ता तातडीने दुरुस्त करा अन्यथा पहिलवान ग्रुपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन गावंडे, प्रवीण पाळदे, रतन पाळदे यांनी दिला आहे.