नैताळेत विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:52 AM2018-08-29T01:52:44+5:302018-08-29T01:53:24+5:30
नैताळे व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश न देणे, बसेस थांब्यावर न थांबवता रस्त्यावर कुठेही थांबवणे आदी विविध समस्या सोडविण्यासाठी नैताळे येथे निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी एक तास बस रोको आंदोलन केले. लासलगाव आगारप्रमुखांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
निफाड : नैताळे व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश न देणे, बसेस थांब्यावर न थांबवता रस्त्यावर कुठेही थांबवणे आदी विविध समस्या सोडविण्यासाठी नैताळे येथे निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी एक तास बस रोको आंदोलन केले. लासलगाव आगारप्रमुखांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे हे गाव पाच ते सात खेड्यांचे प्रमुख केंद्र आहे. नैताळे व परिसरातील गावातील असंख्य प्रवासी व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी बसने नाशिक, औरंगाबाद, लासलगाव, निफाड आदी ठिकाणी प्रवास करीत असतात. मात्र लासलगाव व येवला आगाराच्या काही बसेस नैताळे येथे नाहीत, तर काही बसेस रस्त्यावर कुठेही थांबतात. काही वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या प्रश्नावर अखेर बुधवारी
(दि. २८) सकाळी १० वाजता निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-औरंगाबाद महामार्गावर बस रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास एक तास आंदोलन करण्यात आले़ आंदोलनाची माहिती मिळताच निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी हजर झाले.