विद्यार्थ्यांनी केली ‘राष्टध्वज’ जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:21 AM2019-01-26T00:21:54+5:302019-01-26T00:23:33+5:30

राष्टध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच राष्टÑध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर राष्टÑध्वज प्रबोधन उपक्रम राबविला.

 Students 'National Flag' public awareness | विद्यार्थ्यांनी केली ‘राष्टध्वज’ जनजागृती

विद्यार्थ्यांनी केली ‘राष्टध्वज’ जनजागृती

Next

नाशिक : राष्टध्वजाचा सन्मान राखण्याबरोबरच राष्टÑध्वज वापराविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पंचवटीतील उन्नती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी पेठरोड येथील सिग्नलवर राष्टÑध्वज प्रबोधन उपक्रम राबविला.
राष्टÑध्वजाचा सन्मान करण्याची प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असून प्लॅस्टिक राष्टध्वज न वापरण्याबाबत यावेळी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्टÑध्वजाविषयी जनजागृती केली. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सिग्नलवर थांबून मुलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सर्वसामान्यांनी राष्टध्वजाचा सन्मान राखण्याच्या या मोहिमेत पोलीस आयुक्तांनीही सहभाग घेतला. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुलांमध्ये राष्टभक्ती निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

Web Title:  Students 'National Flag' public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.