विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारीत ज्ञान प्राप्त करावे : व्ही. बी. गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:44 PM2018-02-26T15:44:27+5:302018-02-26T15:44:27+5:30
शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.
नाशिक : शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग के. टी. एच. एम. महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय मोबाईल रिपेअरिंग कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानाचा विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोग होईल. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच प्रात्यक्षिक कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्वांगीन ज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम.बी. मत्सागर यांनी मोबाईल ही अत्यंत गरजेची वस्तू असून मोबाईल दुरुस्ती ज्ञानामुळे या विद्यार्थ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल असे प्रतिपादन केले. लेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख डॉ.व्ही.बी. काळे यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. प्रा. डी. एच. शिंदे यांनी विद्यार्थी विकास मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षक सुनील धांडे यांनी मोबाईल रिपेअरिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले, मोबाईल दुरुस्तीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी तसेच इतर आवश्यक साधनांची ओळख यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना करून देतांना प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी डी. जी. पाटील, डॉ. पी.डी. हिरे, श्रीमती एस. के. जाधव, डी.एन. कडलग, वाय.आर. भामरे, एन.जी. खैरनार, सागर वाटपाडे, यु. एस. डेर्ले, माळेकर, मावळे व राठोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन कु. कोमल मलिक हिने केले.