विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज -धनराज माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:33 PM2018-08-19T18:33:59+5:302018-08-19T18:38:02+5:30
शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे.
नाशिक :शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन असून व्यावसाय उद्योजकतेचे कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून असे परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी केल आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाजदिन सोहळ््यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस डॉ.सुनिल ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, व्यवस्थापन समितीचे अॅड.एकनाथ पगार शिक्षणाधिकारी डॉ.डी.काजळे, डॉ.आर.डी.दरेकर आदि उपस्थित होते.डॉ. धनंजय माने म्हणाले, डॉ.माने पुढे म्हणाले, आजचा विद्यार्थी हा मोबाईल आणि इंटरनेट यामधुन बाहेर येण्यास तयार नाही त्याला मिळणाऱ्या विविध संधीचा त्याने लाभ करून घेतल्यास त्याचा बौद्धिक विकास होईल. अन्न,वस्र,निवारा यासोबतच शिक्षणही आजच्या काळातील मुलभूत गरज असुन त्यामुळे भावी आयुष्य सुखकर होईल. यासाठी शिक्षकांनी देखील आपली शिकविण्याची भुमिका ही प्रामाणिकपणे व सैनिकांसारखी लढाऊ वृतीने निभावली पाहीजे. सर्व कर्मवीरांनी तुम्हाला दिलेल्या संधीचे तुम्ही सोने केले पाहीजे असे सांगुन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. चिटणीस डॉ.सुनिल ढिकले यांनी अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचालीचा प्रवास उलगडून सांगितला. ' कर्मवीरांनी १९१४ साली मविप्र शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. त्यामुळे पाच ते सहा विद्यार्थ्यांवर सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरक ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.