विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा लागणार कस
By admin | Published: July 10, 2017 12:29 AM2017-07-10T00:29:22+5:302017-07-10T00:29:37+5:30
नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत विज्ञान शाखेसाठी महाविद्यालयांक विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत नाशिक शहर व देवळाली छावणी परिषद भागातील विज्ञान शाखेसाठी नामांकित वेगवेगळ्या महाविद्यालयांक डे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असून, शहरातील विज्ञान शाखेच्या उपलब्ध जागांपेक्षा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने सोमवारी जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या नऊ हजार ४४० जागांसाठी ११ हजार ७८१ अर्ज प्राप्त झाले असून, उपलब्ध जागांपेक्षा तब्बल दोन हजार ३४१ अधिक अर्ज विद्यार्थ्यांनी अर्ज केले असल्याने विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेत प्रवेशासाठी कस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. विज्ञान शाखेखालोखाल वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांनी पसंती दिली असून, वाणिज्यच्या आठ हजार ४८० जागांसाठी ९ हजार ३४६ अर्ज प्राप्त झाले असून, उपलब्ध जागांपेक्षा ८६६ अधिक विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत, तर कला आणि एचएससीव्हीसी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल घटला असून, कला शाखेच्या पाच हजार २०० जागांसाठी