उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नासाच्या संशोधकांशी थेट संवादाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 05:14 PM2018-09-07T17:14:15+5:302018-09-07T17:15:30+5:30
मराठा विद्या प्रसारक समाज व नॅशनल स्पेस सोसायटीच्या (युएसए) नाशिक शाखेतर्फे संयुक्तरीत्या ४ ते १० आॅक्टोबरदरम्यान ‘वर्ल्ड स्पेस विक’ साजरा करणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार व युएसएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी शुक्रवारी (दि.७)दिली असून जगभरात असा प्रयोग पहिल्यांना नाशिकमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
नाशिक : वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त मविप्र व नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (युएसए)निबंध,पोष्टर व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासाच्या संशोधकांनी थेट प्रेक्षपणाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. मराठा विद्या प्रसारक समाज व नॅशनल स्पेस सोसायटीच्या (युएसए) नाशिक शाखेतर्फे संयुक्तरीत्या ४ ते १० आॅक्टोबरदरम्यान ‘वर्ल्ड स्पेस विक’ साजरा करणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार व युएसएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी शुक्रवारी (दि.७)दिली असून जगभरात असा प्रयोग पहिल्यांना नाशिकमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
जागतिक अंतराळ सप्ताहादरम्यान आठवी ते बारावी व महाविद्यालयीन अशा दोन गटात निबंध,पोष्टर व मॉडेल स्पर्धा होणार आहे. निबंध स्पर्धेत स्पेस युनिटस द वर्ल्ड, अंतराळ ही एक संकल्पना आहे. चंद्र/मंगळ शोध आणि वसाहत, अंतराळातील खनीज संसाधने, अंतराळातील शेतकरी, अंतराळातील कचºयाची हाताळणी, अंतराळ वाहतूक, अंतराळातील सौरउर्जा अशा विषयांवर विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत १५०० शब्दांमध्ये संगणकीकृत निबंधलेखनाचा सारांश व मुख्य निबंध तीन प्रतींमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत तर पोष्टर व मॉडेल ३० सप्टेंबरपर्यंत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयात समक्ष येऊन जमा कराव्या लागणार आहे. अंतराळ सप्तहात विद्यार्थ्यानी बनविलेले पोष्टर्स, माडेल्स आणि इस्त्रोने खास पाठविलेले मॉडेल्स रोज संध्याकाळी ४ ते ७ यावेळी बघण्याची सधी नागरिकांनाही मिळणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी अविनाश शिरोडे, डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी, विजय बाविस्कर व मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे डॉ.एन.एस.पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मविप्र व युएसएच्या नाशिक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
जागतिक अंतराळ सप्ताहची सुरुवात, अंतराळ विज्ञान व क्षेत्र, इस्त्रोची अभिमानास्पद भव्य कामगिरी, अंतराळ क्षेत्रांत कार्यरत संस्था याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ४ आॅक्टोबर २०१८ ला शोभायात्रेने होईल. या शोभायात्रेत उद्बोधक फलकांसह सुमारे १००० विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इस्त्रोच्या पीएसलव्हीसह विविध प्रतिकृतीही सहभागी होणार आहे.