सेंट्रल किचनला विद्यार्थ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:06 AM2017-08-21T00:06:05+5:302017-08-21T00:18:15+5:30
आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना घेराव घातला. विशेष म्हणजे सकाळपासून जेवणच न मिळाल्याने उपाशीपोटी आंदोलन करणाºयांपैकी एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन तो पडल्याचीही घटना घडली.
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या जिल्ह्यातील सुमारे चाळीस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अचानक सेंट्रल किचनमधून जेवण पुरविण्यास सुरुवात करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण पोहचत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना घेराव घातला. विशेष म्हणजे सकाळपासून जेवणच न मिळाल्याने उपाशीपोटी आंदोलन करणाºयांपैकी एका विद्यार्थ्याला चक्कर येऊन तो पडल्याचीही घटना घडली. आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला केटरर्स ठेकेदारांमार्फत जेवण पुरविले जाते. यासाठी अनेक ठेकेदार असल्याने सदर ठेकेदारांमार्फत विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन व्यवस्थेच्या माध्यमातून साउथ इंडियन नास्ता आणि जेवण मिळू लागल्याने याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रारही दाखल केली होती. मात्र नवीन निविदा निघाल्याने एकाच ठेकेदाराकडून जेवण येत असल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. मात्र विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून जेवण पुरविले जात असल्यामुळेच जेवण मिळण्याबाबत अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे तसेच साउथ इंडियन जेवण दिले जात असल्याची बाब विद्यार्थ्यांना समजली. रविवारी विद्यार्थ्यांना सकाळचा नास्ता आणि जेवणच उपलब्ध न झाल्याने या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागाचे प्रकल्प कार्यालय गाठून तीव्र घोषणाबाजी करीत सेंट्रल किचन व्यवस्था बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी सकाळपासून सुरू केलेल्या आंदोलनानंतर दुपारी प्रकल्प अधिकारी अमोल हेडगे दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घातला. मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्री सुरूच होते.
सकाळपासून उपाशीपोटी आंदोलन सुरू असल्याने आंदोलनकर्त्या एका विद्यार्थ्याला चक्कर आली. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते.मंत्र्यांशी चर्चा
आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नसल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे लकी जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या रोजच्या अन्नाचा प्रश्न असतानाही प्रशासनाकडून फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोप जाधव यांनी केला.
गुन्हे दाखल करा
आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत गांभीर्य न दाखविता अचानकपणे सेंट्रल किचनची व्यवस्था करणे ही बाब म्हणजे आदिवासी वसतिगृह बंद करण्याचा शासनाचा घाट आहे. सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळत नाही. पोळ्या काळ्या पडतात. अन्न थंड असते. शिवाय साउथ इंडियन जेवण आदिवासी विद्यार्थ्यांना दिले जाते. मुलांना हे जेवण पचत नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाºया प्रकल्प अधिकाºयांवर प्रसंगी गुन्हे दाखल करा.
- लकी जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी