विद्यार्थ्यांचा मार्ग खडतरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:22 AM2018-06-20T01:22:34+5:302018-06-20T01:22:34+5:30

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड या स्मार्ट रोडचे काम सुरू केले़ ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील तीन शाळांतील ११ हजार ६५० विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे वृत्त दैनिक लोकमतने १४ जून रोजी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मातीचा कच्चा रस्ता तयार केला असून, तीन नंबरचे प्रवेशद्वार खुले केले आहे़ यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खडतर मार्ग काहीअंशी मोकळा झाला आहे़

Students scam! | विद्यार्थ्यांचा मार्ग खडतरच !

विद्यार्थ्यांचा मार्ग खडतरच !

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट रोड : पर्यायी कच्चा रस्तापर्यायी व्यवस्थेसाठी स्टेडियमचे प्रवेशद्वार उघडले

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड या स्मार्ट रोडचे काम सुरू केले़ ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील तीन शाळांतील ११ हजार ६५० विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे वृत्त दैनिक लोकमतने १४ जून रोजी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मातीचा कच्चा रस्ता तयार केला असून, तीन नंबरचे प्रवेशद्वार खुले केले आहे़ यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खडतर मार्ग काहीअंशी मोकळा झाला आहे़
स्मार्ट रोडचे काम सुरू असलेल्या मार्गावर आदर्श हा1यस्कूल, डी. डी. बिटको बॉइज आणि गर्ल्स हायस्कूल आणि शासकीय कन्या विद्यालय या तीन शाळा आहेत़ रस्त्याचे काम सुरू करताना महापालिकेने ना शालेय प्रशासनाशी चर्चा केली ना शाळकरी विद्यार्थ्यांचा विचार केला़ तसेच विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्यांना प्रशासन दाद देत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या मार्ग तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते़ रस्त्याच्या कामामुळे शासकीय कन्या विद्यालयाचे बंद होणारे प्रवेशद्वार तसेच स्टेडियममध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे बिटको हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा मुद्दा मांडण्यात आला होता़
विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशावर लोकमतने मांडलेल्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनाने एमजीरोडवरील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या इमारतीजवळील तीन नंबरचे गेट विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे़

Web Title: Students scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.