विज्ञान नाट्यविष्कारातून विद्यार्थ्यांनी दिला डिजिटल इंडियासह ‘स्वच्छ भारत’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 06:12 PM2018-09-11T18:12:34+5:302018-09-11T18:18:43+5:30
जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोणातून नाट्याविष्कार सादर करीत डिजिटल इंडियसोबत स्वच्छ भारत घडविण्याचा संदेश दिला.
नाशिक : जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोणातून नाट्याविष्कार सादर करीत डिजिटल इंडियसोबत स्वच्छ भारत घडविण्याचा संदेश दिला. जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागातर्फे आदर्श माध्यमिक विद्यालयात ‘विज्ञान आणि समाज’ विषयावरील जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवाला मंगळवारपासून (दि.११) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातून तालुकास्तरावर निवड झालेल्या संघांपैकी नियोजित दहा पैकी नऊ संघांनी उपस्थित राहून विविध नाट्याविष्कार सादर केले. यात नाशिक शहरातील इंदिरानगर येथील डे केअर सेंटर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन विषयांतर्गतकाव काव नाट्याविष्काराचे सादरीकरण के ले, तर नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागातून गिरणारे येथील के.बी.एच. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही याच विषयाला अनुसरून ‘प्रलय’ ही कलाकृती सादर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील के. आर.टी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ विषयांतर्गत ‘चला डिजिटल भारत घडवू या’ नाटिका सादर केली. दिंडोरीच्या ननाशी येथील जनता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाने स्वच्छता ‘स्वास्थ आणि आरोग्य’या विषयांतर्गत अनुसरून ‘हगणदरीमुक्त गाव’ कलाविष्कार सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एम.आर.पी. विद्यालय, कळवण तालुक्यातील अभोणा येथील जनता विद्यालय व इगतपुरी तालुक्यातील घोटीच्या आदर्श कन्या विद्यालयानेही याच विषयावर प्रकाश टाकत नाट्याविष्कार सादर केले. मालेगावच्या पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘डिजिटल इंडिया- एक स्वप्न जगण्यापलीकडे’नाटकाचे सादरीकरण के ले. येवला तालुक्यातील एन्झोकेम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ आरोग्य व पर्यावरण संवर्धन या विषयांचा मेळ घालून नाट्याविष्कार सादर केला.कैलास बागुल, जुई शेरीकर, मीनाक्षी दौंड व प्रतिभा महाजन यांनी परीक्षण केले.